Details

भेंडी : पांढरी माशी

Listen

Author : AsmitaRejeshirke

भेंडी पिकात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पांढऱ्या माशी मार्फत विषाणूजन्य रोग पसरतात. यामध्ये पानांच्या शिरा पिवळसर होणे, जाड होणे, फळे पिवळी पडणे यांचा समावेश असतो. पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळवल्यास अशा अनेक रोगांवर नियंत्रण मिळवता येते. भेंडी पिकातील पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, पीक वाढीच्या अवस्थेत पिवळे चिकट सापळे एकरी 15 ते 20 लावावे. तसेच जास्त प्रादुर्भाव आढळ्यास व सापळ्यांवर कीड जास्त प्रमाणात चिकटल्यास इमिडाक्लोप्रिड 70% डब्लूजी घटक असलेले कीटकनाशक (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 0.1 ग्रॅम प्रति लिटर पाणी तसेच युपीएल लान्सरगोल्ड (असिफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% एसपी)  @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर आणि टाटा माणिक (एसिटामिप्रिड 20 एसपी ) @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.


याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


  • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home

  • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre


18 April 2022

share

No comments

Ask any questions related to crops

Ask questions
Call our customer care for more details
Take farm advice

Ask Help