Beej se bajar tak
 खोजें
 / 
 / 
पशुधन संजीवनी हेल्पलाइनची झाली सुरूवात, जाणून घ्या त्याचे फायदे

पशुधन संजीवनी हेल्पलाइनची झाली सुरूवात, जाणून घ्या त्याचे फायदे

लेखक - Soumya Priyam | 27/4/2022

पशुपालन हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे स्रोत राहिले आहे, जे कालांतराने अनेक शेतकऱ्यांसाठी तसेच इतर व्यक्तींच्या उत्पन्नाचा  ही स्रोत बनत चालले आहे. परंतु गाईं-महीशींच्या च्या विविध जाती, प्रदेश किंवा रोगांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा घरगुती उपचारांवर किंवा दूरच्या भागात आणि शहरांमध्ये असलेल्या वैद्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उपचाराचा खर्चही वाढतो. जनावरांमध्ये वाढणारे आजार आणि योग्य उपचार सुविधांचा अभाव यामुळे पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पशुधन संजीवनी हेल्पलाइनची सुविधा सुरू केली आहे, जी दुर्गम भागातही केवळ एका फोन कॉलने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. तंत्रज्ञानाचा आणि उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर करून याचे निराकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पशुधन संजीवनी हेल्पलाइनबद्दल अधिक माहिती येथे पहा.

पशुधन संजीवनी हेल्पलाइनचा शेतकऱ्यांना मिळणारा लाभ आणि त्यासाठीची प्रक्रिया

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना 1962 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून जनावरांच्या आजारांची सामान्य माहिती केंद्राला द्यावी लागेल.

  • पशुवैद्यकांना त्यांच्या घरोघरी पोहोचून पशुवैद्यकीच्या सुविधा पुरविल्या जातील.

  • पशुधन संजीवनी हेल्पलाइनवर कृत्रिम गर्भाधान सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.

  • माहिती मिळाल्यानंतर 5 ते 12 तासांत उपचाराची सुविधा उपलब्ध होईल.

  • पशुपालकांना गोठवलेल्या वीर्याची उपलब्ध जात आणि त्याचे दूध उत्पादन याबद्दल देखील माहिती दिली जाईल.

  • जनावरांच्या उपचारासाठी राज्यस्तरीय कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

  • या योजनेंतर्गत प्राण्यांचे औषधही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

  • पशुपालक शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवांमध्ये उपचार, लसीकरण आणि जनावरांची काळजी यासारखी सर्व पशुसंवर्धना विषयीची माहिती मिळेल.

हे देखील वाचा:

वरील माहितीवर तुमचे विचार आणि शेतीसंबंधीचे प्रश्न तुम्ही आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आजच्या पोस्टमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना या माहितीचा लाभ घेता येईल. शेतीशी संबंधित महत्वपूर्ण आणि रंजक माहितीसाठी देहातशी संपर्कात रहा.

0 लाइक और 0 कमेंट
यह भी पढ़ें -
पशुधन संजीवनी हेल्पलाइन की हुई शुरुआत, जानें इसके लाभ
पशुधन संजीवनी हेल्पलाइन की हुई शुरुआत, जानें इसके लाभ
संबंधित वीडियो -
किसान क्रेडिट कार्ड के लिए ऐसे करें आवेदन और ब्याज दर में पायें विशेष छूट

कृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें

farmer-advisory

COPYRIGHT © DeHaat 2022

Privacy Policy

Terms & Condition

Contact Us

Know Your Soil

Soil Testing & Health Card

Health & Growth

Yield Forecast

Farm Intelligence

AI, ML & Analytics

Solution For Farmers

Agri solutions

Agri Input

Seed, Nutrition, Protection

Advisory

Helpline and Support

Agri Financing

Credit & Insurance

Solution For Micro-Entrepreneur

Agri solutions

Agri Output

Harvest & Market Access

Solution For Institutional-Buyers

Agri solutions

Be Social With Us:
LinkedIn
Twitter
Facebook